दिलासादायक! नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर

जिल्ह्यात आतापर्यंत 378 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

नंदुरबार | जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून त्याचे प्रमाण 70 टक्के झाले आहे. आतापर्यंत 378 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. 30 जुलै पर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची एकूण संख्या 545 आहे. त्यापैकी उपचारानंतर 378 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या 116 ऍक्टिव्ह रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 वैद्यकीय अधिकारी 33 परिचारिका आणि 20 इतर कर्मचारी रुग्णांना 24 तास सेवा देण्याचे काम करत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात 38 व्हेंटिलेटरस व 30 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात आणखी 135 ऑक्सीजन बेडची भर पडणार आहे. शिवाय कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना आजार उपचारानंतर बरा होत असल्याने न घाबरता तपासणीसाठी पुढे यावे असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies