6 महिन्यांनी उघडले केदारनाथ धामचे कपाट, दर्शनासाठी लोटली भाविकांची गर्दी

उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचे कपाट आज सकाळी उघडण्यात आले आहेत. मंत्रोच्चारणात पूर्ण विधीनंतर केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात आले.

एएम न्यूज नेटवर्क । उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचे कपाट आज सकाळी उघडण्यात आले आहेत. मंत्रोच्चारणात पूर्ण विधीनंतर केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात आले. यादरम्यान ऊखीमठवरून आणण्यात आलेल्या भगवान केदारनाथच्या गादीला पुन्हा एकदा मुख्य मंदिरात स्थापित करण्यात आले. यानंतर आता नेहमीप्रमाणे पुढचे सहा महिने भगवान महादेवाची पूजा केली जाईल.

यावेळी मंदिर परिसराची फुलांनी सजावट करून रोषणाईही करण्यात आली होती. तथापि, केदार धामात सध्या चहुकडे बर्फाची मोठी चादर अंथरलेली दिसून येत आहे. यामुळे येथे कडाक्याची थंडीही आहे. तरीही भाविकांच्या भक्तीत कोणतीही कमी दिसून आली नाही.

गंगोत्री, यमुनोत्रीचे कपाट उघडले...

उत्तराखंडच्या गढवाल हिमालयातील जगप्रसिद्ध गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे कपाट मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले. याबरोबरच या वर्षाच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली. चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून गढवाल हिमालयातील बद्रीनाथ धामाचे कपाट 10 मे रोजी उघडले जाणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies