अबब ! या हॉटेलमध्ये 8 लोकांनी केले जेवण, रेस्तरॉने दिले 44 लाखांचे बिल 

या बिलामुळे ही हॉटेल अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होती. 

नवी दिल्ली | सोशल मीडियावर हॉटेलचे बिल नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी दोन केळींसाठी भारतात शेकडो रुपये मोजण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता राहुल बोसकडून पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये देण्यात आलं होतं. असेच अनेक प्रकरण नेहमीच घडत असतात. काही दिवसांपूर्वी चीनच्या शंघाईमध्येही असेच प्रकरण समोर आले. या हॉटेलने 8 लोकांच्या डिनरसाठी 418,245 युआन म्हणजे 44 लाख 26 हजार रुपयांपेक्षाही जास्त बिल दिले. या बिलामुळे ही हॉटेल अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होती. 

या बिलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ 20 फूड आयटम्स मागवण्यात आले होते. केवळ 20 प्रकारच्या पदार्थांसाठी 44 लाखांचे बिल द्यावे लागत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. शंघाईच्या 'मॅगी रेस्तरॉ' मध्ये दुबईमधून आलेले 8 लोक डिनर करण्यासाठी पोहोचले होते. चीनच्या एका प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बिल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हे बिल पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत फोटोशॉप केले असल्याचे सांगितले. मात्र रेस्तरॉच्या मालक आणि चीफ शेफ सन झाओगुओने मान्य केले की, हे बिल खरे आहे आणि त्यांनी अति महागडे डिनर सर्व्ह केले होते. 

मॅगी रेस्तरॉचे चीफ शेफ सन झाओगुओनुसार हे डिनर दुबईमधून आलेला एक ग्राहक आणि त्याच्या मित्रांसाठी तयार करण्यात आले होते. हे डिनर बनवण्यासाठी 2000 वर्षे जुने सॉल्ट प्लेटचा वापर करण्यात आला होता. या महागड्या डिनरचा एक व्हिडिओही मोठ्या प्रामाणात शेअर करण्यात आला होता. मात्र चीनच्या बाजार नियमांनुसार हे महागडे डिनर नियमांचे उल्लंघन आहे. काही दिवासांपूर्वी तपासणी करणारे काही अधिकारी रेस्तरॉमध्ये पोहोचले होते. मात्र अनेक तास चौकशीकरुन अधिकारी परतले. तपासणीचा रिपोर्टही समोर आला नाही. AM News Developed by Kalavati Technologies