Travel Guide: अविस्मरणीय अनुभूती देणारे जगातील 5 सुंदर डेस्टिनेशन्स,

जगभरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. सुंदर ठिकाणांवर भेटी द्यायला सर्वांनाच आवडते. प्रसिद्ध ठिकाणांवर जास्त लोक भेटी देतात. पण काही लोकांना गर्दी नसणा या ठिकाणांवर जायला जास्त आवडते.

जगभरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. सुंदर ठिकाणांवर भेटी द्यायला सर्वांनाच आवडते. प्रसिद्ध ठिकाणांवर जास्त लोक भेटी देतात. पण काही लोकांना गर्दी नसणा या ठिकाणांवर जायला जास्त आवडते. अशा ठिकाणचा प्रवास अविस्मरणीय ठरत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांविषयी सांगणार आहोत. हे ठिकाण सुंदर तर आहेच यासोबतच येथे पर्यटकांची जास्त गर्दीही नसते.

1. ब्रूनेई
हा एक पूर्व आशियातील लहानसा देश आहे. आपल्या घनदाट जंगलांसाठी हा देश ओळखला जातो. ब्रूनेईमध्ये सुल्तान ओमर आली सेफुद्दीन मस्जिद इस्लामी आर्किटेक्चरचा शानदार नमुना आहे. येथे 2016 मध्ये 2.19 पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या.

 

2. मोल्डोवा
हा देश यूक्रेन आणि रोमानियाच्या मध्यभागी आहे. या देशात तुम्हाला मध्ययुगीन किल्ले, रोमन इमारती आणि अनेक प्राचिन ठिकाणं पाहायला मिळतील. तरीही येथे जास्त लोक फिरायला येत नाहीत. 2016 मध्ये येथे फक्त 1.21 लाख लोक फिरायला आले होते.

3. तिमोर लेस्टे
हा देश आशियामध्ये आहे. येथे खुप कमी पर्यटक भेटी देतात. 2016 मध्ये या देशात फक्त 66 हजार पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या.

4. किरिबाती
प्रशांत आशिया क्षेत्रात वसलेले किरिबाती हे 33 लहान-लहान द्विपांमध्ये विभागले आहे. या देशाची राजधानी साउथ तरावाच्या तटांवर दूसरे महायुध्द झाले होते. आता हे फिशिंग करण्यासाठी प्रसिध्द आहे. पण तरीही येथे 2016 मध्ये फक्त 4000 लोकांनीच भेटी दिल्या होत्या.


5. तुवालु
तुवालु देश दक्षिण प्रशांत महासागरात वसलेले आहे. या देशातही पर्यटक जास्त भेटी देत नाहीत. 2016 मध्ये या ठिकाणी फक्त 2000 लोक फिरायला गेले होते. या देशात अपराध खुप कमी होतात. विशेष म्हणजे या देशाचे कोणतेही सैन्य नाही. या देशाची लोकसंख्या फक्त 10000 आहे.AM News Developed by Kalavati Technologies