इथियोपियन एअरलाइन्सचे बोइंग विमान क्रॅश, प्रवासी व क्रू मेंबर्ससहित 157 जण ठार

इथियोपियन एअरलाइन्सचे बोइंग 737 विमान रविवारी क्रॅश झाले. यात एकूण 149 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स स्वार होते. वृत्तसंस्थेनुसार, या दुर्घटनेत कोणीही जिवंत वाचल्याची शक्यता नाही. हे विमान इथियोपियाची राजधानी अदिस अबाबाहून केनियाच्या नैरोबी येथे जात होत

एएम न्यूज नेटवर्क । इथियोपियन एअरलाइन्सचे बोइंग 737 विमान रविवारी क्रॅश झाले. यात एकूण 149 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स स्वार होते. वृत्तसंस्थेनुसार, या दुर्घटनेत कोणीही जिवंत वाचल्याची शक्यता नाही. हे विमान इथियोपियाची राजधानी अदिस अबाबाहून केनियाच्या नैरोबी येथे जात होते. विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.38 वाजता उड्डाण घेतले आणि याच्या 6 मिनिटांनीच विमानाशी संपर्क तुटला होता. इथियोपियाचे पंतप्रधान कार्यालयाने या भीषण दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी विमान क्रॅश झाल्याच्या घटनेला दुजोरा देत म्हटले की, विमान नेमके कुठे क्रॅश झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, आफ्रिका खंडातील सर्वात मोठी एअरलाइन्स म्हणून इथियोपियन एअरलाइन्सला ओळखले जाते.AM News Developed by Kalavati Technologies