मुंबई | व्हॉटसअॅप हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर व्हॉटसअॅप ने नवनवीन फिचर्स आणि अपडेट्सचा सपाटा लावला आहे. आता कंपनीने एक नवीन अपडेट आणलं आहे, ज्यामुळे युजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक मजेदार होईल. व्हॉटसअॅप लाँचिंगपासून युजर्सच्या मागणीनुसार स्वतःला अधिक अद्ययावत करत आलेलं आहे. चॅटिंग अधिक गंमतीदार बनवण्यासाठी युजर्स याचा मोठ्या प्रमाणात स्टिकर्सचा वापर करतात. या स्टिकर्समध्ये नवीन अपडेट आलं आहे. नव्या अपडेटनुसार युजर्सना नवीन अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक मिळेल.
व्हॉट्सअॅपचं स्टिकर्स हे फिचर आता नऊ भाषांमध्ये वापरता येईल. यामध्ये अरबी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच व्हॉटसअॅप मध्ये अपडेट्स आहेत पर्मनंट ग्रुप म्यूट ,मल्टी डिव्हाइस सपोर्ट, ५० जणांसह व्हिडीओ चॅट, स्टेट्स फिचर, इमोजीस, अॅनिमेटेड स्टिकर्स आणि जीआयएफ, क्यू आर कोड फॉर न्यू काँटॅक्टस,अॅडव्हान्स सर्च, डार्क मोड