भारीच! आता WhatsApp Web मध्ये करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग

व्हॉट्सॲप वेबमध्ये आता ग्राहकांना कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे

नवी दिल्ली । आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार व्हॉट्सॲप कायमच आपल्या ॲपमध्ये बदल करीत असते. काही दिवसांपुर्वीच व्हॉट्सॲपने 'व्हॉट्सॲप पे' ची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. त्यापाठोपाठ आता व्हॉट्सॲप कंपनीकडून आणखी एक बदल केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या ग्राहकांनी कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. आपल्या ग्राहकांच्या मागणीला मान ठेवून व्हॉट्सॲप कंपनीने आता व्हॉट्सॲप वेब वर ऑडिओ आणि व्हि़डिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सॲप बेटा इंन्फोने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप वेबमध्ये स्टेटसच्या जागी आता कॉलिंगचा पर्याय दिला जाणार आहे. येत्या काही दिवसात ग्राहकांना यासाठी अपडेट दिला जाणार आहे. सध्या मोजक्याच ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळणार असून, टप्याटप्याने सर्वच ग्राहकांना याचा आनंद घेता येणार आहे. इतकच नाही तर व्हॉट्सॲप वेबवर कॉलिंग सुरू असतांना ग्राहक सेम टाईम आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपमध्ये चॅटिंग सुद्धा करू शकणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies