'VI' Down : वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र झाला नॉट रिचेबल!

पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे

मुंबई । टेलिकॉम क्षेत्रामध्ये भागीदारी केलेल्या 'वी' अर्थात वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क राज्यात पुर्णत: गुल झाले आहे. सर्वरच्या तांत्रिक बिघाडामुळे राज्याच्या निम्म्याहून अधिक सर्कलमध्ये 'वी' च्या ग्राहकांना नेटवर्कचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या अशा भोंगळ कारोभारामुळे ग्राहक संतापले आहे. बुधवारी राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे त्या रात्रीपासून 'वी' चे नेटवर्क गायब झाले होते. नेटवर्कच नसल्याने ग्राहकांना कंपनींच्या ग्राहक सेवा केंद्राशी सुद्धा संपर्क होऊ शकला नाही.

त्यामुळे 'वी' चे ग्राहक कंपनीच्या या ढिसाळ कारभाराविरोधात सोशल मीडियावर उतरले आहे. ग्राहकांनी ट्विटर कंपनीविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे. तर एकीकडे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा सुरू आहे. अशातच नेटवर्कच येत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक 'वी' विरोधात संतप्त झाले आहे. आज औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरात ग्राहकांनी 'वी' च्या स्टोअर बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र लवकरच सेवा सुरळीत होईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies