देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी TVS कडून लाँच, दुचाकीची 'ही' आहेत वैशिष्ट्य

किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य दुचाकींप्रमाणे असेल, पण इंधनासाठी लागणारा खर्च तुलनेते खूप कमी होईल.

दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनवणारी जागतिक पातळीवरील कंपनी टीव्हीएस मोटर्सने Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते या मोटरसायकलचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यावरणस्नेही इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दुचाकी हरित आणि शाश्वत मोबिलीटीसाठी चांगला पर्याय ठरू शकणार आहे.  या दुचाकीचे जगभरात 3. 5 कोटी ग्राहक आहेत. दुचाकी वाहन उद्योगाला हरित आणि शाश्वत मोबिलिटीच्या सुविधा द्यायच्या आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड आणि पर्यायी इंधन यांचा समावेश असल्याचे टीव्हीएसचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले. देशामध्ये साखर कारखान्यासह इतर उद्योगाकडून इथेनॉलेचे उत्पादन घेण्यात येते. ते बिनविषारी, जैविक विघटन होणारे आणि हाताळणे, वाहतूक आणि साठविण्यासाठी सुरक्षित आहे. इथेनॉलचा वाहनामध्ये वापर केल्यास पेट्रोलियम आयात कमी होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

इथेनॉलचे हे विषारी नसून बायोडिग्रेडेबल आहे. हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने सुरक्षित मानलं जातं. हे ऑक्सिजनेटेड इंधन असून यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 35% आहे. त्यामुळे इथेनॉल जळत असताना त्यातून नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण कमी असतं. याशिवाय इथेनॉल कार्बन मोनॉक्सईड उत्सर्जन, पर्टिक्युलेट मॅटर आणि सल्फरडाय ऑक्साईड यांचं प्रमाण कमी करण्यात देखील मदत करते. इंधन म्हणून इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा होण्यास मदत होत आहे. सध्या पेट्रोलमध्येही 10 ते 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळलं जातं. टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 वर इथेनॉल लोगोसोबत ग्रीन ग्राफिक्स देण्यात आलं आहे. यामध्ये ट्वीन-स्प्रे-ट्वीन-पोर्ट ईएफआय तंत्रज्ञान आहे. गाडी चालवण्यात अधिक चांगली सुलभता, वेगवान थ्रोटल रिस्पॉन्स आणि उत्सर्जन पातळीमधील घट हे वैशिष्ट्य आहे. या दुचाकीची सर्वात जास्त शक्ती 8500 आरपीएमला 21 पीएस आणि टॉर्क 7000 आरपीएमला 18.01 एनएम आहे. ही गाडी दर तासाला 129 किमी इतका सर्वात जास्त वेग गाठू शकते, असा दावा कंपनीने केलाय.

केवळ साखर निर्मिती करणे हे आता परवडणारे नाही. त्यामुळे कारखानाचालकांनी पूरक व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. त्यामुळे कारखाना आणि ऊस उत्पादकांना अधिक लाभ होईल, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नमूद केले. नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणाऱ्या बस सुरू केल्या आहेत. येत्या महिन्यांभरात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य दुचाकींप्रमाणे असेल, पण इंधनासाठी लागणारा खर्च तुलनेते खूप कमी होईल. पेट्रोल, डिझेल आयातसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. इथेनॉलसारख्या पर्यावरणपूरक इंधनावर भर दिल्यास या खर्चात कपात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.AM News Developed by Kalavati Technologies