मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. येथे कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीवर माहिती दिली. अंबानी म्हणाले की, आतापर्यंत जियोचे 340 मिलियनपेक्षाही जास्त ग्राहक झाले आहेत. यासोबतच एखाद्या देशात सर्वात जास्त ऑपरेट होणारी जगातील दुसरी कंपनी बनण्याचा मान जियोने मिळवला आहे. यादरम्यान, जियो गीगाफायबरच्या प्लॅनची माहिती सर्वांना देण्यात आली. ग्राहकांना प्रतिमहिना 700 रुपयांपासून या ब्रॉडबँड सेवेचा लाभ घेता येईल.
वार्षिक सभेदरम्यान मुकेश अंबानी यांनी माहिती दिली की, होम ब्रॉडबँड सर्व्हिस जियो गीगाफाइबरसोबत ग्राहकांना 1GBPS पर्यंत ब्रॉडबँड स्पीड, लँडलाइन फोन, अल्ट्रा हाय डेफिनेशन एंटरटेन्मेंट, व्हर्च्युअल रिअॅलिटी कंटेंट, मल्टी-पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हॉइस एनॅबल्ड व्हर्च्युअल असिस्टंट, इंटरअॅक्टिव्ह गेमिंग, होम सिक्युरिटी आणि स्मार्ट होम सोल्यूशन्स मिळतील. सभेदरम्यान जियो फायबर सर्व्हिसची माहिती देण्यात आली. येथेच जियो सेटटॉप बॉक्सची घोषणा करण्यात आली. या सेट टॉप बॉक्समये सर्व गेमिंग कंट्रोलर्सला सपोर्ट मिळेल. जियो फायबरमध्ये मिक्स्ड रिअॅलिटीलाही सपोर्ट मिळेल. याच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग, एज्युकेशन आणि एंटरटेन्मेंटला VR हेडसेटच्या माध्यमातून अनुभवता येईल.

RIL Chairman and Managing Director, Mukesh Ambani: Jio Fibre tariff plan to start from Rs 700 per month. https://t.co/wyNUVS7lqe
— ANI (@ANI) August 12, 2019
जियो गीगाफाइबर 5 सप्टेंबर 2019 पासून उपलब्ध होईल. गीगाफायबरचे प्लॅन 100 MBPS स्पीडपासून ते 1GBPS पर्यंत उपलब्ध असतील. हे प्लॅन्स 700 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. येथे व्हॉइस कॉल्स फ्री मिळतील. जियो फायबरसोबत OTT अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. प्रीमियम जिओ फायबर कस्टमर्सना मूव्ही रिलीज होण्याच्या पहिल्या दिवशीच आपल्या घरी मूव्ही पाहायला मिळेल.
वार्षिक बैठकीदरम्यान इंटरनॅशनल कॉलिंगसाठी फिक्स्ड-लाइन रेट्सचीही माहिती देण्यात आली. युजर्सना अनलिमिटेड US/कॅनडा पॅक 500 रुपये प्रतिमहिना या दराने मिळेल. यासोबत जियो पोस्टपेड प्लॅन्सचीही माहिती या सभेत देण्यात आली.