स्मार्टफोन कॅमेरा वापरुन आता 30 मिनिटात समजणार कोव्हिड-१९ चा निकाल

वैज्ञानिकांनी कोविड-१९ चे परीक्षण करण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे, स्मार्टफोन कॅमेरा वापरुन आता 30 मिनिटात समजणार कोव्हिड-१९ चा निकाल

 वॉशिंग्टन | वैज्ञानिकांनी सीआरआयएसपीआर आधारित कोविड-१९ चाचणीसाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन कॅमेरा वापरुन अवघ्या ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात अचूक निकाल मिळविता येतो. 'सेल' मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार यातून केवळ पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह निकालच मिळत नाही तर व्हायरल लोड (म्हणजेच विषाणूचं संकेद्रण) देखील तपासलं जातं.

अमेरिकेतील ग्लेडस्टोन इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ संशोधक जेनिफर डाउडना म्हणाले की, 'आरआयएसपीआर-आधारित चाचणीबद्दल आम्ही उत्सुक आहोत. कारण जेव्हा आवश्यकतेनुसार त्वरित व अचूक निकाल मिळतो.' डाउडना म्हणाले की, 'हे विशेषत: त्या ठिकाणी उपयोगी येईल की, जिथे चाचणी सीमित आहे किंवा वारंवार वेगाने चाचणीची गरज पडते. यामुळे कोविड-१९ बाबत येणारे अनेक अडथळे पार करू शकेल.'AM News Developed by Kalavati Technologies