'भारतीयांच्या हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतंय इस्रायली तंत्रज्ञानाची मदत' - आ. जितेंद्र आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे...

मुंबई । भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हाट्सअप मेसेज मे २०१९ पर्यंत त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा व्हाट्सअपने इस्रायलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये केला आहे. यात मोदी सरकार भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केले आहे. त्यामुळे सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे. संविधानाने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकूमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हॉट्सअप मेसेज मे 2019 पर्यंत त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा व्हाट्सअपने इस्रायलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यात केला आहे. एनएसओ ही कंपनी पीगेसस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते आणि आणि मोबाईल धारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. 'एक्सप्लॉईट लिंक' या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केलात तर पीगेसस तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हाट्स अपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो, हे या खटल्यामुळे उघडकीस आले आहे. याबाबत आमदार आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सामान्य माणसे, कार्यकर्ते यांच्यावरील ही हेरगिरी आपण सहन करणार नसल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय.

अमेरिकेत हेन्री किसिंजर आणि अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यानंतर निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. भारतात सुद्धा कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांना फोन टॅपिंग प्रकरणाची जबर किंमत मोजावी लागली होती. तर मग आता नरेंद्र मोदी कोण मोठे लागून गेले की जे बेकायदा, अनैतिक आणि अश्लाघ्य मार्गाने आपल्याच देशाच्या नागरिकांवर अशी हेरगिरी करतील? आज जे राजकीय विरोधकांच्या बाबतीत घडतं, ते उद्या ज्यांची भक्ती किंचितही कमी झाली, त्यांच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. विरोधकांचा बंदोबस्त करण्याची ही पद्धत, एक सवय किंवा प्रघात पडेल आणि त्यातून मोदी समर्थक सुद्धा भविष्यात सुटणार नाहीत. मी एक सामान्य राजकीय कार्यकर्ता आहे. पण सामान्य माणसं मिळूनच लोकशाही निर्माण होत असते. या लोकशाहीचा एक भाग म्हणून मी आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा निषेध नोंदवत आहे. माझ्या आवाजात आवाज मिळवा ही विनंती, असेही आमदार आव्हाड यांनी म्हटलंय.AM News Developed by Kalavati Technologies