ह्युंदाईची पहिली इलेक्ट्रिक कोना कार भारतात लाँच, एकदा चार्ज केली की 452 किमी धावणार

यामध्ये 39.2 kwh आणि 64 kwh असे दोन पर्याय मिळतात. लहान बॅटरीमध्ये तुम्ही ही कार 300 किलोमीटरपर्यंत चालवू शकता आणि 6 तासांमध्ये तुम्ही चार्ज करु शकतात. या व्हेरिएंटमध्ये कार 134 पीएस इतकी पावर जनरेट करते. ही कार अवघ्या 9.3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोम

ह्युंदाई कंपनीची इलेक्ट्रिक कार कोना भारतात लाँच करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही असलेल्या या गाडीची किंमत 25 लाख 30 हजार रुपये आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे अवघ्या 57 मिनिटात फुल चार्ज करू शकता येते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 452 किलोमीटर अंतर पार करू शकते.

ही कार भारतीय बाजारात 9 जुलै रोजी लॉन्च करण्यात येणार होती त्यानुसार कंपनीने या संबंधितलं लॉन्चिंग इन्विटेशनही पाठवलं आहे. ही कार ह्युंदाई कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार यापूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार दोन बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 39.2 kwh आणि 64 kwh असे दोन पर्याय मिळतात. लहान बॅटरीमध्ये तुम्ही ही कार 300 किलोमीटरपर्यंत चालवू शकता आणि 6 तासांमध्ये तुम्ही चार्ज करु शकतात. या व्हेरिएंटमध्ये कार 134 पीएस इतकी पावर जनरेट करते. ही कार अवघ्या 9.3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटरचा स्पीड घेऊ शकते.

तर 64 kwh व्हेरिएंट असलेली कार तुम्ही एकदा फूल चार्ज केली तर ही कार 450 किलोमीटर पर्यंत ड्राईव्ह करु शकते. फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही कार एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. या कारमध्ये तुम्हाला 203 पीएस पावर मिळते. भारतामध्ये लॉन्च होणाऱ्या या कारची डिझाइन आंतरराष्ट्रीय मॉडल प्रमाणेच असणार आहे. कंपनीने या कारमध्ये जास्त बदल केले नाहीत.AM News Developed by Kalavati Technologies