गुगलचे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Google Pixel 3a आणि Pixel 3a XL हे दोन स्मार्टफोन 15 मेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

एएम न्यूज नेटवर्क | Google Pixel 3a आणि Pixel 3a XL हे दोन स्मार्टफोन 15 मेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मोबाइल प्रेमींमध्ये गुगलचे स्मार्टफोन्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावेळीही दोन हँडसेट लॉन्च करून गुगलने ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या आहेत. हे दोन्ही मोबाइल 7 मेला गुगलने I/O 2019 या वार्षिक परिषदेत सॅन फ्रांसिस्को येथे लॉन्च केले.

Pixel 3a मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे. या मोबाइलची किंमत 39,999 रुपये इतकी ठेवली आहे. त्याचबरोबर Pixel 3a XL मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोअरेज दिले आहे. याची किंमत 44,999 रुपये इतकी ठेवली आहे. गुगलने Pixel 3a XL आणि Pixel 3a या दोन्ही मोबाइलला 128GB व्हेरिएंटचीही घोषणा केली आहे. परंतु हे व्हेरिएंट्स सध्या भारतात विक्री होणार नाहीत. ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतीयांना उपलब्ध होतील.

Pixel 3a आणि Pixel 3a XL हे मोबाइल ग्राहक फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. यासाठी 8 मेपासून रजिस्ट्रेशन करता येईल. या स्मार्टफोन्सची विक्री भारतात 15 मेपासून सुरू होईल. सोबतच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना Pixel 3a हा मोबाइल खरेदी केल्यानंतर 3 महिन्यांसाठी YouTube Music प्रीमियम मिळेल.

असे आहेत स्पेसिफिकेशन्स

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर दिलेला आहे. 3a XL मध्ये मोठी 6-इंच स्क्रीन दिली आहे, तर Pixel 3a ला 5.6-इंच स्क्रीन दिली आहे. Pixel 3a साठी प्लास्टिक बॉडी आणि ड्रॅगनट्रेल ग्लास लेयर स्क्रीन जोडलेली आहे. दोन्ही स्मार्टफोन्स सिंगल सिम फोन आहेत, परंतु यामध्ये iPhone XS आणि Pixel 3 फोनसारखी eSIM च्या माध्यमातून ड्युएल-सिम सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी Pixel 3a 12 मेगापिक्लऐ इमेज सेन्सर दिलेला आहे. जो याआधी Pixel 3 फोनमध्ये होता. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार Pixel 3a आणि Pixel 3a XL युजर्सना फोनमध्ये क्लिक केलेल्या फोटोजसाठी गुगल ड्राइव्हमध्ये अनलिमिटेड स्टोअरेज मिळेल. सोबतच भारतातील युजर्सना 3 महिन्यांसाठी गुगल यूट्यूब प्रीमियम सर्व्हिस मोफत मिळणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये Android Q चा अपडेट दिला जाईल. 3 वर्षांसाठी यामध्ये सिक्युरिटी आणि OS अपडेट दिली जाईल. Pixel 3a मध्ये 3000mAh ची आणि Pixel 3a XL मध्ये 3700 mAh बॅटरी देण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies