भारीच! आजपासून व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा पाठवता येणार 'पैसे'; जाणून घ्या..

आजपासून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑनलाईन पैशाची देवाण-घेवाण करता येणार असून, त्यासाठी आपल्याला आपला व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे

नवी दिल्ली । सोशल मीडियाच्या जगात आघाडीवर असलेली कंपनी व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार नेहमीच बदल करत असते. त्यामुळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हॉट्सअ‍ॅपचे स्थान आजही कायम आहे. सध्या डिजीटल इंडिया ही संकल्पना आमलात आल्याने, डिजीटल पेमेंटवरच देशाचा कल आहे. अगदी चहाचा गाडावाला असो किंवा 5 स्टार हॉटेलवाला सगळेच आता डिजीटल झाले आहेत. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी डिजीटल पेमेंट प्रणाली आमलात आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटची सुविधा कंपनीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर अखेर व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 'व्हॉट्सअ‍ॅप पे' साठी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना पेमेंटची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला कोणतीही फीस देण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांना फक्त आपला जुना व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. अशी माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली.

गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या अ‍ॅप प्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपपे सुद्धा 'युनिफाईट पेमेंट इंटरफेस' अर्थात UPI सिस्टमवर चालणार आहे. गुगल पे, फोन पे प्रमाणे क्यू आर कोड स्कॅन करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंटची देवाण-घेवाण सुद्धा करू शकता. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सुमारे 40 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. मात्र सध्याला 2 कोटी ग्राहकांनाचं ही सेवा वापरता येणार आहे.

त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने ICICI Bank, HDFC Bank, Axis bank, Sbi आणि JIo Payments Bank सोबत भागीदारी केली आहे. या बॅंकांमध्ये आपले खाते नसले तरी आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवू शकणार आहे.


Published by: Salman ShaikhAM News Developed by Kalavati Technologies