बुधवारी दुपारीनंतर फेसबुकचा वेग मंदावल्यामुळे फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी

आमच्या लाखो युजर्सना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे फेसबुकने म्हटले आहे.

एएम न्यूज | आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल म्हटलं की, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तर आलंच... मात्र बुधवारी दुपारनंतर या समाज माध्यमांचा वेग मंदावला होता. तांत्रिक कारणांमुळे सर्वांना ही अडचण येत होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपचा वापर करताना अनेक अडचणी येत होत्या. यासोबतच फोटो आणि व्हिडिओ अपलोड आणि डाउनलोड होण्याचा वेग कमालीचा मंदावला होता. या सर्व प्रकरणानंतर आता फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुक यूजर्सला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर असल्याचे फेसबुकने म्हटलं आहे.

बुधवारी दुपारनंतर फेसबुकचा वेग कमालीचा मंदावला होता. सर्वच क्षेत्रातील मंडळींना याची अडचण आली होती. फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओज दिसत नव्हते. फोटो अपलोड आणि डाऊनलोड होण्यासही अडचणी येत होत्या. यामुळे सोशल मीडिया यूजर्सचा चांगलाच संताप झाला. मात्र आता फेसबूकने याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. आम्ही बुधवारी दुपारपासून या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले आहे. तसेच आता ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच दिलगिरी व्यक्त केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies