COVID-19 CALLER TUNE : आजपासून बदलणार तुमच्या मोबाईलची 'कोरोना कॉलर ट्यून'

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून कोरोना लसीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नवीन टयून तुमच्या मोबाईंलमध्ये लावण्यात आली आहे

नवी दिल्ली । (सलमान शेख) देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि तेव्हापासून देशात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कोरोना जनजागृतीसाठी 'दो गज दूरी मास्क है जरूरी' ही कॉलर ट्यून लावण्यात आली होती. सुरुवातीला ही ट्युन ऐकायला प्रत्येकाला चांगली वाटली मात्र, कालांतराने अनेक जण या ट्युनला वैतागले होते. त्या वैतागलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अमिताभ बच्चनची 'दो गज दूरी मास्क है जरूरी' ही ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैतागलेल्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी नक्कीच म्हणावी लागेल.

देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, त्यापार्श्वभुमीवर आता कोरोना लस बदल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून प्रत्येकाच्या मोबाईल कोरोना लसीकरणाची आणि भारतीय कोरोना लसीवर विश्वास ठेवा. अशी ट्यूट ऐकू येणार आहे. ही ट्यून हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत असणार आहे. विशेष म्हणजे यात अमिताभ बच्चनचा आवाज नसुन जसलीन भल्ला यांची आवाज असणार आहे. कोरोनाची ट्यून बंद करण्यात यावी, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. या ट्यूनमुळे कॉल कनेक्ट होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने, तसेच अतिमहत्वाचे काम असल्यास कॉल लवकर लागत नसल्याने ही टयून बंद करावी असे अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र केंद्र सरकारने ती बंद केली नव्हती.

या कारणामुळे बदलला अतिमाभ बच्चनचा आवाज

सरकारने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून प्रत्येकाच्या मोबाईल मोबाईलमध्ये अमिताभ ऐवजी जसलीन भल्लाची आवाज ऐकू येणार आहे. देशात कोरोनाची लस तयार झाली असून, आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकार कोरोना लसीकरण आणि स्वदेशी कोरोना लसीवर विश्वास ठेवण्याचा संदेश देण्यासाठी ही नवीन ट्युन तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षाभरापासून जनता अमिताभ बच्चनच्या आवाजाला कंटाळली होती, त्यामुळे अमिताभ ऐवजी जसलीन यांचा आवाज ट्यूनसाठी वापरण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies