Chandrayaan-2 : इस्रोसाठी पुढील 12 दिवस महत्वाचे, विक्रम लँडरच्या शोधामुळे अपेक्षा वाढल्या

पुढील 12 दिवस चंद्रावर दिवस असेल. यानंतर चंद्रावर रात्र असेल, रात्री विक्रमशी संपर्क साधणे कठीण होईल.

नवी दिल्ली । विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरची थर्मल प्रतिमा क्लिक केली आहे. विक्रम लँडरशी अद्याप संपर्क झाला नाही. इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी म्हटले आहे की, टीम लेंडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे आणि लवकरच संपर्क स्थापित होईल. शास्त्रज्ञांच्या मते विक्रमशी संपर्क साधण्यासाठी त्याच्याकडे 12 दिवस आहेत.

विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोला 12 दिवसांचा कालावधी आहे. कारण चंद्राचा दिवस सध्या चालू आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवर 14 दिवसांइतका आहे. यापैकी 2 दिवस उलटून गेले आहेत. म्हणजेच, पुढील 12 दिवस चंद्रावर दिवस असेल. यानंतर चंद्रावर रात्र असेल, जी पृथ्वीच्या 14 रात्रींच्या बरोबरीची आहे. रात्री विक्रमशी संपर्क साधणे कठीण होईल.

दरम्यान, इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी असेही म्हटले आहे की, आम्हाला विक्रम लँडरबद्दल कळले आहे, तो चंद्राच्या पृष्ठभागावर दिसला आहे. ऑर्बिटरने लँडरचे थर्मल चित्र काढले आहे. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचा संवाद झालेली नाही. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

विक्रम लँडर लँडिंगच्या निश्चित जागेपासून 500 मीटर अंतरावर असल्याचीही माहिती आहे. चंद्रयान -2 च्या कक्षामध्ये बसविण्यात आलेल्या ऑप्टिकल हाय रिझोल्यूशन कॅमेर्‍याने विक्रम लाँडरचा फोटो काढला आहे.

आता विक्रम लाँडरला वैज्ञानिक संवाद कक्षाद्वारे संदेश पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरुन त्यांची संप्रेषण यंत्रणा चालू होईल. बेंगळुरूमधील इस्रो सेंटरकडून विक्रम लाँडर आणि ऑर्बिटरला सातत्याने मेसेजेस पाठवले जात आहेत जेणेकरून संवाद सुरू होऊ शकेल.AM News Developed by Kalavati Technologies