मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत वेबसाइटचे ट्विटर खाते हॅक करण्यात आले असून, हॅकर्सने बिटकॉइनची मागणी केली आहे

नवी दिल्ली । मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट अर्थात 'ट्विटर' हॉकिंग संदर्भात नेहमीत चर्चेत असते. बराक ओबामा, एलोन मस्कसह आणखी बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तीचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. संबंधीत हॅकर्सने कोविड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून, बिटकॉइनची मागणी केली आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून, पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या असे ट्विट मोदींच्या वेबसाइटच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले होते.

आणखी, एका ट्विटमध्ये हॅकर्सने ट्विट केले आहे की, " अकाउंट जॉन विक([email protected]) या व्यक्तीने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम हॅक केलेले नाही." असे ट्विट हॅकर्सने केले होते, मात्र आता तो ट्विट डिलीट करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies