सावधान! तुमच्या मोबाईलवर आलाय केबीसीचा 'हा' मॅसेज, थांबा...

केबीसीच्या नावान सध्या अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एकस मॅसेज पाठवण्यात येत आहे, त्या मॅसेजमध्ये 25 लाखाचे अमिष दाखवण्यात येत आहे

मुंबई । घरात बसल्या बसल्या आपण बिंगबीचा 'कोन बनेगा करोडपती' हा शो तर पाहिलाच असेल. या कार्यक्रमात अनेकस जण प्रश्नाचे उत्तर देऊन करोडपती होतात. कधी कधी तो शो पाहता-पाहता आपल्याला ही अमिताभ बच्चनं केबीसी मध्ये आमंत्रण द्यावं आणि आपणही करोडपती व्हावं असे विचार शो पाहता-पाहता आपल्या मनात सतत फिरत असतात. अशातच जर तुमच्या मोबाईलवर खरोखरच असा मॅसेज आला तर.

सावधान! अशा मॅसेजला विश्वास ठेवू नका. कारण एक छोटीशी चुकी आपल्याला महागात पडू शकते. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना व्हॉट्सअॅपवर कोन बनेगा करोडपती संदर्भात संदेश येत आहेत. या संदेशात आपण केबीसीमध्ये 25 लाख रुपये जिंकले असून, आपला नंबर केबीसी लॉटरीमध्ये लागला आहे. असा मॅसेज अनेकांच्या मोबाईलवर फिरत आहे. कदाचीत तो तुमच्या मोबाईलवर सुद्धा आला असेल.

या मॅसेजमध्ये अमिताभ बच्चन आणि पीएम मोदी यांच्या आवाजात एक ऑडिओ संदेश देण्यात आला आहे. त्यात अभिनंदन आपला नंबर केबीसीमध्ये निवडण्यात आला आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लॉटरी पासवर्ड घेऊन केबीसीमध्ये सहभाग घ्या. असा मॅसेज व्हायरल होत आहे. असा संदेश जर तुमच्या मोबाईलवर आला तर त्यावर क्लिक करू नका अन्यथा आपला एक क्लिक माहागात पडू शकतो.

अशा प्रकारचा मॅसेज सध्या व्हायरल होत आहे :

78692200090576

Hi, Namashkar!

I am vijay Kumar from KBC Koun Banega Carorepati Mumbai!


Congratulation,

Your whatsapp Number Selected in KBC Sim Card Lucky Draw Compitation 2020!

You have won 25,000,00,Lacs KBC Cash Prize.

Apka whatsapp Number KBC All india Sim Card Lucky Draw Compitation Main Winner Bangaya hai!

25,000,00, Lacs KBC Cash Prize Ka!

Please Contact Now KBC Office WhatsApp No:9522850993

KBC Manger:Mr Akash Verma

is Online And get your KBC Prize Money information!

Your Lottery No:————

Your KBC File No:————

Dear winner please only call to WhatsApp!

Apney Kisi Bhi WhatsApp Number KBC Office Me Whatsapp Call karein!

Thank you! Jai HindAM News Developed by Kalavati Technologies