डेस्क स्पेशल । अॅमेझॉन प्राईम डे 2020 ची सुरूवात आज झाली आहे. दरवर्षी हा सेल 3 किंवा 4 दिवस चालतो. मात्र यंदा हा सेल आज सुरू झाला असून; उद्या तो संपणार आहे. यामध्ये प्रत्येक वस्तूंवर अॅमेझॉनकडून मोठी सुट देण्यात आली आहे. याचा फायदा अॅमेझॉन प्राईम ग्राहक घेऊ शकतात. यादरम्यान जर ग्राहकांनी एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केली तर; त्यांना 10 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. कारण हा सेल अॅमेझॉनच्या प्राईम मेंबरसाठी असून, या ऑफरसाठी मेंबरशीप अनिवार्य आहे. या सेलमध्ये विशेषत: सॅमसंग आणि आयफोनच्या मोबाईलवर विशेष सुट देण्यात आली आहे. जर तुमच्या मनात आयफोन घेण्याचा विचार सुरू असेल, तर ही ऑफर तुमच्यासाठी लाभदायी असू शकते.
आयफोन 11 घेण्यासाठी तुम्हाला 59,900 रुपये मोजावे लागणार आहे. ह्या मोबाईलची मुळ किंमत ही 68,300 रुपये इतकी आहे. तसेच सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 10 या मोबाईलवर सुद्धा मोठी सुट देण्यात आली आहे. 71,000 रुपयांचा हा फोन ग्राहकांना अवघ्या 44,999 रुपयात मिळणार आहे. सोबतच वनप्लसच्या 7 टी प्रो मोबाईलवर सुद्धा मोठा डिस्काउंट देण्यात आला आहे. 53,999 रुपयांचा हा मोबाईल 43,999 रुपयांला ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय बजेट स्मार्टफोनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.