भारीच! आता व्हॉट्सअ‍ॅपवर 'विमा' देखील खरेदी करता येणार

देशातील कोट्यवधी युजर्सना पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर, आता व्हॉट्सअ‍ॅपने आरोग्य विमा खरेदीचा देखील पर्याय उपलब्ध करुन दिला आहे

नवी दिल्ली | देशातील कोट्यवधी युजर्सना पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅप आरोग्य विमा खरेदीचा देखील पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. देशातील मोठा वर्ग आरोग्य विम्यापासून वंचित असल्याने त्यांना परवडणाऱ्या दरात विमा योजना खरेदीसाठी व्हॉट्सअ‍ॅप मदत करणार आहे.

फेसबुकचा कार्यक्रम फ्युल ऑफ इंडिया 2020 मध्ये बोलताना व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले की, भारतात व्हॉट्सअ‍ॅप चे सुमारे 40 कोटी युजर्स असून त्यांच्यासाठी नवनव्या सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे. एमेकांशी संलग्न राहण्याबरोबर त्यांना सुरक्षित व्यासपीठ देणे आमचे कर्तव्य असल्याने डिजिटल व्यवहार या ग्राहकांनी अधिक स्वरुपात करावा, यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटनंतर आरोग्य विमा योजना आणल्यानंतर येत्या काळात व्हॉट्सअ‍ॅप वर आणखी अनेक सुविधा उपलब्ध करुण दिल्या जाणार आहेत.

भारताताल मोठा वर्ग आजही आरोग्य विम्यापासून वंचित आहे. त्यांना सरळ आणि सहजरीत्या आरोग्य विमा मिळावा आणि सहजरीत्या आरोग्य विमा मिळावा आणि त्याचे लाभ सहजरीत्या कळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. चालू वर्षअखेरपर्यंत परवडणाऱ्या दरातील आरोग्य विम्याची खरेदी व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार आहे, असे अभिजीत बोस यांनी सांगितले आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप पे ही देयक सुविधा सध्या दोन कोटींहून अधिक वापरर्त्यांसाठी खुली झाली असून त्यासाठी भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अ‌ॅक्सिस या चार बड्या बँकांचे सहाय्य मिळवण्यात आले आहे.

एकमेकांशी संपर्क साधण्याचा सोपा, विश्वासार्ह, खासगी आणि सुरक्षित अनुभव प्रदान करणारे व्हॉटसअ‍ॅप हे व्यासपीठ आता वित्तीय गरजांचीही काळजी घेणाऱ्याउपाययोजना प्रस्तुत करणार आहे, असे व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पेशेन ऑफ इंडियाच्या यूपीआय प्रमालीवर व्हॉट्सअ‍ॅप ने ही सुविधा विकसित केली आहे आणि चालू वर्षी नोव्हेंबरपासून या सुविधेंतर्गत पैसे हस्तांतरणाला या व्यासपीठाने मान्याता मिळवली आहे.AM News Developed by Kalavati Technologies