Same 2 Same कपिलदेव! रणवीरने स्वत:च्या वाढदिवशी शेअर केला '83' मधला लूक

रणवीरचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल...

मुंबई । रणवीर सिंहने 6 जुलैला स्वत:च्या वाढदिवशी आगामी '83' सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात तो माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये तुम्ही रणवीर सिंहला कपिलदेव यांच्या अवतारात पाहू शकतात. रणवीरचा हा लूक सेम टू सेम कपिलदेव यांच्यासारखा असल्याची प्रशंसा चाहते करत आहेत. विशेष म्हणजे रणवीरच्या या आगामी सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका रणवीरची खरी पत्नी दीपिका पादुकोनच साकारणार आहे.

अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी रणवीरच्या लूकचे कौतुक केले आहे. आलिया भट्ट, अदिती राव हैदरी, हुमा कुरैशी, भूमी पेडणेकर, सोनू सूद, सान्या मल्होत्रा यांनी रणवीरवर कौतुकाचा वर्षाव करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीरच्या फोटोवर क्रिकेटपटू शिखर धवननेही आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, रणवीर एकदम पाजी म्हणजेच कपिलदेव यांच्यासारखा दिसत आहे. यासोबतच शिखरने रणवीरला जन्मदिनच्या शुभेच्छाही दिल्या.AM News Developed by Kalavati Technologies