अखिल भारतीय पोलीस क्रीडास्पर्धेत मोनालीने मिळवले पाच सुवर्ण आणि एक रौप्य

पोलीस शिपाई मोनालाीच्या पदोन्नती साठी प्रस्ताव होणार सादरबुलढाणा । पश्चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडास्पर्धेत बुलडाणा पोलीस दलातील पोलीस शिपाई मोनाली जाधव हिने धनुर्विद्या स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले असून परत एकदा बुलडाणा पोलीस दलाच्या पेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मोनाली जाधव ही २०१३ मध्ये पोलीस दलात भरती झाली असून, ती बुलडाण्यामधील आनंद नगर येथील राहवासीं आहे. ती आंतरराष्ट्रींय खेळाडू म्हणूनही प्रसिध्द आहे. सध्या ती जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे, मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम बंगाल येथे अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत तिने सलग चार दिवस उत्कृष्ठ खेळाडू म्हणून ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवले आहे, या स्पर्धेत देशातील अर्धसैनिक बलाचे ४४ आणि बलातील ५२३ खेळाडू सहभागी झाले होते.

यापूर्वी देखील मोनालीने विश्व पोलीस क्रीडा स्पर्धेत १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवले आहे. ती भारतीय धनुर्विद्या संघात विश्वकप देखील खेळली आहे.
बुलडाणा मधील अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात मोनाली आपल्या आई सोबत राहते. आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही परिस्थिती अभावी अजूनही ती तिन पत्र्यांच्या घरात राहते. त्यामुळे परिस्थिवर मात करत मोनालीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले असून बुलडाणा पोलीस दलातर्फे पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. सोबतच पोलीस विभागातील तरतुदी नुसार मोनालीच्या पोलीस शिपाई पदावरून पदोन्नती संदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies