आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर ही नेतृत्व करत असलेल्या संघाची वर्ल्डकपसाठी निवड

मेंढपाळ कुटुंबातील मुलगी वर्ल्डकप या सर्वोच्च ठिकाणी देशाच्या संघाचे नेतृत्व करणार

पुणे । बारामती तालुक्यातील आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर ही नेतृत्व करत असलेल्या संघाची वर्ल्डकपसाठी नुकतीच निवड झालीय. आशिया खंडातील विविध देशांच्या संघा पैकी भारताचा हा प्रमुख संघ आहे. चीनमध्ये पूर्वतयारी व निवड करण्यासाठी हे सामने भरवण्यात आले असतांना यावेळी ही निवड करण्यात आली. अत्यंत गरीब आणि मेंढपाळ कुटुंबातील ही मुलगी वर्ल्डकप या सर्वोच्च ठिकाणी देशाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. बारामतीच्या तरडोली सारख्या अत्यंत ग्रामीण खेडे गावातून ही मुलगी या खेळात आपले स्थान टिकून आहे. यासाठी आवश्यक सोयी सुविधांचा पुरता अभाव असल्याने तिच्यासमोर अनेक समस्या आहेत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने आशिया खंडातून आठ संघांना चीन या देशात खेळण्याची संधी देण्यात आली होती. यामधून भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बेसबॉलसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणारी प्रमुख खेळाडू कुमारी रेश्मा पुणेकर ही बारामती तालुक्यातील एका मेंढपाळाची मुलगी आहे.


आगामी विश्वचषक स्पर्धेला भारतीय टीम नुकतीच पात्र ठरली. 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत चायना येथील पांडा या स्टेडियमवर या स्पर्धा पार पडल्या आहेत. या खेळाची पूर्वतयारी करत असताना सलग तीन ते चार तास नगर म्हणून सामना करणाऱ्या या मुलीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन विशेष मुलाखत घेण्यात आलीय. यातूनच एलजी कपसाठी कोरिया या देशाच्या संघाने तीला विशेष निमंत्रित खेळाडू म्हणून पाचारण केले आहे. संपूर्ण देशाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झालेल्या या गरीब खेळाडू मुलीचे सर्वत्र कौतूक होत आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीमूळे प्रशासकीय अनास्थेमुळे अध्याप कोणत्याच अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकार्यांनी या मुलीचे कौतुक करण्याची दखल घेतलेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies