स्पोर्टस डेस्क । विश्वचषकाचा 44वा सामना भारत विरुद्ध श्रीलंकेमध्ये होत आहे. लीड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजीचे निमंत्रण दिले आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 264 धावा केल्या आहेत. भारताचा श्रीलंकेवर सहा विकेट्स राखून विजय
अशी झाली भारताची पडझड
- भारताचा श्रीलंकेवर सहा विकेट्स राखून विजय
- 43 षटकांच्या अखेरीस भारताच्या 3 बाद 263 धावा; विजयासाठी 42 चेंडूत 2 धावांची गरज
- केएल राहुल 111 धावा काढून झेलबाद
- 40 षटकांच्या अखेरीस भारत 1 बाद 232 धावा. भारताला विजयासाठी 65 चेंडूत 33 धावांची गरज
- रोहित-राहुलची सलामीसाठी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतली 189 धावांची विक्रमी भागीदारी
- रोहित शर्माचं शतक पूर्ण, एका वर्ल्डकप स्पर्धेत पाच शतकं ठोकणारा रोहित ठरला पहिलाच खेळाडू
- चौथ्या षटकात केवळ 1 धाव, भारत बिनबाद 28 धावा (रोहित- 59, राहुल- 37)
- 3 षटकांत एकूण 3 चौकार, भारताच्या बिनबाद 27 धावा
अशी झाली लंकेची पडझड
- श्रीलंकेच्या 50 षटकांत 7बाद 264 धावा; भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान
- अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्यानं टिपला अप्रतिम झेल, थिसारा परेरा 2 धावांवर बाद
- जसप्रीत बुमराहच्या 10 षटकांत 37 धावा आणि 3 विकेट
- अँजलो मॅथ्यूजला बुमराहने धाडलं माघारी, रोहित शर्मानं कव्हर्समध्ये टिपला झेल; मॅथ्यूजने केल्या 113 धावा
- कुलदीप यादवने मॅथ्यूज-थिरिमाने जोडी फोडली; थिरिमाने 53 धावांवर बाद
- कुशल मेंडिसच्या रूपाने लंकेची चौथी विकेट गेली. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर फर्नांडो यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद झाला.
- कुशल परेराच्या रूपाने श्रीलंकेची दुसरी विकेट गेली. बुमराहच्या चेंडूवर धोनीकरवी तोही झेलबाद झाला. या विकेटसोबतच जसप्रीत बुमराहने 101 बळी पूर्ण केले आहेत. कुशल परेराने 14 चेंडूंचा सामना करताना 18 धावा काढल्या.
- लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या रूपाने पहिला बळी गेला. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर तो धोनीकरवी झेलबाद झाला. करुणारत्नेने 17 चेंडूंमध्ये 10 धावा काढल्या.

Jasprit Bumrah strikes!
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
Nine dots in a row from him, and the pressure tells as #DimuthKarunaratne gets a toe-end through to MS Dhoni.
Sri Lanka are 17/1#CWC19 | #SLvIND pic.twitter.com/2mNseluhOO
दोन्ही संघांमध्ये बदल
तत्पूर्वी, टीम इंडियाने संघात दोन बदल करत शमी आणि चहल यांना विश्रांती दिली आहे. त्याऐवजी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना संधी दिली आहे. श्रीलंकेनेही आज एक बदल करत वांडर्सेच्या ऐवजी थिसारा परेराचा संघात समावेश केला आहे. गुणतालिकेत भारत दुसऱ्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ 9व्यांदा वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले आहेत. यापैकी श्रीलंकेला 4 सामन्यांत विजय मिळाला, तर भारताची तीनच सामन्यांत सरशी झाली होती. एक सामना अनिर्णीत राहिला होता.
भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, रोहित शर्मा, कुलदीप यादव.
श्रीलंकेचा संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडिस, धनंजय डिसिल्व्हा, अविष्का फर्नांडो, लसिथ मलिंगा, एंजेलो मॅथ्यूज, कसून रजिथ, थिसारा परेरा, लाहिरू थिरिमाने, इसुरू उदाना.