11 साल बाद... विराट-विल्यमसन पुन्हा आमनेसामने

19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्येही विराट आणि विल्यमसन यांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तीदेखील उपांत्य लढतच होती. त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला नमवले होते.

उद्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यफेरीचा पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ आठव्यांदा तर भारतीय संघ सातव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत पोहोचला आहे. या सामन्यात एक अजब योगायोग जुळून येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि केन विल्यमसनच्या कप्तानपदाखालील दोनी संघ आमनेसामने येणार असले तरी या दोघांच्या कर्णधारपदाखाली हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत नाहीत. 2008 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्येही विराट आणि विल्यमसन यांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तीदेखील उपांत्य लढतच होती. त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला नमवले होते.


केवळ विराट आणि केन विल्यमसनच नव्हे तर त्या संघात भारताचे प्रतिनिधित्व करणारा रवींद्र जाडेजा आणि किवी संघातील ट्रेन्ट बोल्ट व टिम साऊदी हेदेखील आताच्या संघात आहेत. आताच्या वर्ल्डकपमधील उपांत्य लढतीत भारत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या सिनियर संघाचे कर्णधार म्हणून दोघेही पुन्हा एकदा उपांत्यफेरीत आमने-सामने येतील. आमच्या बॅचचे त्या वर्ल्डकपमधले बरेच खेळाडू आज आपआपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत. माझ्या दृष्टीने ही खूप सुंदर आठवण आहे. त्यावेळी मी किंवा केन विल्यमसनने पुन्हा एकदिवस आम्ही वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत समोरासमोर येऊ असा विचार केला नव्हता अस मत विराटने पत्रकार परिषदेत मांडलेे.

उद्या आम्ही जेव्हा भेटू तेव्हा मी त्याला याची आठवण करुन देईन असे कोहलीने सांगितले. उद्याच्या सामन्यात निर्णय खूप महत्वाचे असतील. उपांत्यफेरीसारखा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांकडे पुरेसा अनुभव आहे. न्यूझीलंडचा संघ मागच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे बादफेरीचा सामना कसा खेळायचा हे त्यांना ठाऊक आहे. हा वर्ल्डकप सुद्धा त्यांच्यासाठी चांगला ठरला. त्यामुळे ते उपांत्यफेरीपर्यंत पोहोचले असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.AM News Developed by Kalavati Technologies