एक 'मनोहर' मित्र...
मनोहर पर्रीकर प्रेमात पडावे असे मित्र. आमची मैत्री कशी झाली, ते नाही कळत. पण गट्टी जमली. आमचे फक्त पटले नाही, ते एकाच विषयात. ते मासे खायचे आणि मी बघत बसायचो! पत्रकारांपासून ते दूर राहत. फार नाही,पण अंतर ठेवत. सगळे पत्रकार मित्रही असेच सांगायचे.