संक्रातीच्या तोंडावर विड्याच्या पानाचे भाव वाढले, सुगडीच्या खणामागे दहा रुपयांची वाढ

सांगलीला आलेल्या पुराचा फटका याभागातील पानमळ्यांना बसला. त्यामुळे स्थनिक भागातील किंवा इंदापूर येथुन येणारी पान महाग झाली

पुणे । ऐन संक्रातीच्या तोंडावर संक्रातीसाठी पूजेला लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या सुगड्यांच्या खणा मागे दहा रुपयाची वाढ झाली. तर संक्रांतीच्या सनाला अत्यंत महत्त्वाचे असलेल्या विड्याचे पान दुपटीने महागलं आहे.

सांगलीला आलेल्या पुराचा फटका याभागातील पानमळ्यांना बसला. त्यामुळे स्थनिक भागातील किंवा इंदापूर येथुन येणारी पान महाग झाली. हेच या विड्याच्या पाणाच्या किमती वाढण्यामागच कारण असल्याचे व्यापारी सांगतात. संक्रातीच्या पूजेसाठी सुगड्यांचा वापर केला जातो. यामधूनच वाण घेऊन सुवासिनी पूजा करत असतात. सुगडीच्या बणवण्याच काम परंपरेने कुंभार समाज करतो. मात्र आजच्या तरुण पिढीने हे काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे काही ठराविक लोक थोड्या प्रमाणात सुगडी बनवण्याचा व्यवसाय करतात. मागणी जास्त पुरवठा कमी यामुळे या सुगडीच्या खणाच्या भावातही गेल्यावर्षीपेक्षा दहा रुपयांनी वाढ झाली आहे.

संक्रांतीच्या सनाला लागणार विड्याचे पान असो, सुगडीचा खण असो किंवा इतर पूजेचे साहित्य असो किमती वाढल्या तरी पूजेसाठी त्या आवश्यक असतात. त्यामुळे ग्राहक त्या खरेदी करताना दिसत आहेत. संक्रांतीच्या सनाला राज्यात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पुजेसाठी लागणा-या साहित्यामध्ये झालेल्या वाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies