आंबेगावात विहिरीत आढळले मावस भाऊ-बहिणीचे मृतदेह, आत्महत्येचा संशय

ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणे । आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील पांढरे वस्तीत सख्ख्या मावस भाऊ आणि बहिणीचे विहिरीत मृतदेह आढळले. अक्षय अशोक जाधव आणि ऋतुजा उत्तम तट्टू अशी मृतांची नावे आहेत. तथापि, विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे एका विहिरीत मुला-मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पांढरे वस्तीत शंकराच्या मंदिरामागे घोड नदीकाठी असलेल्या विहिरीत या दोघांचे मृतदेह सापडले. अक्षय अशोक जाधव (वय 24) व ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19) हे दोघेही मावस बहीण-भाऊ असून आत्महत्या झाली की हत्या झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies