सांगलीत आणखी दोन जणांना कोरोनाची लागण, एकूण संख्या 72 वर

जिल्ह्यात आज दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

सांगली | जिल्ह्यात आज दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. रुग्णांमध्ये धारावी येथून आलेल्या एका महिलेचा आणि वाळवा येथील एका पुरुष समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 72 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 38 जण या आजारातून पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहे. तर आजवर 2 जणांचा बळी या आजारानं घेतला आहे. अद्यापही 32 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहे. AM News Developed by Kalavati Technologies