इंदापुरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; संघर्ष समितीने अंत्यविधीस घेतला पुढाकार

कोरोनामुळे मृत पावलेल्या दोघांवर संघर्ष समितीच्या पुढाकाराने अंत्यविधी करण्यात आला

इंदापूर | इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पत्रकारांना दिली. इंदापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका अंदाजे 70 वर्षीय पुरुषाचा गुरुवार दि.30 जुलै रोजी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आज दि.31 जुलै रोजी पहाटे च्या सुमारास अंदाजे 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदर मृतांचा अंत्यविधी इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीचे साथी प्रा.कृष्णा ताटे, साथी गफूर सय्यद, आकाश गावडे, सुरज मिसाळ, अजिंक्य ताटे, अमोल खराडे, अजय राजपुत आदी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झाला. दि.30 जुलै रोजी मृत झालेल्या व्यक्तीला मुखअग्नी तहसीलदार सोनाली मेटकरी व साथी गफुर सय्यद यांनी दिला. व त्याचप्रमाणे आज दि.31 जुलै रोजी मृत पावलेल्या सत्तर वर्षीय महिलेचा अंत्यविधीही करण्यात आला. यावेळी प्रशासकीय यंत्रणा व मृताचे कुटूंबातील सदस्यही उपस्थित होते.

या दोन्ही अंत्यविधीच्या वेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकिय अधिक्षक डाँ.एकनाथ चंदणशिवे, डॉ.सुहास शेळके,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, मुख्याधिकारी डाँ.प्रदीप ठेंगल यांच्यासह नागरि संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies