आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

सोलापूर । परतीच्या पावसाने राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्यावर आहे. तर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तीन दिवसीय राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते नुकसानीची पाहणी बारामती जिल्ह्यातून करणार आहे.

परतीच्या पावसाचा जोरदार फटका पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला बसला असून, तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. परतीच्या पावसामुळे कापूस, बाजरी, मका, सोयाबीन, ऊस अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांना शेतकऱ्यांना धीर देत आपण या संकटातून लवकरच मार्ग काढून पुन्हा उभे असे धीर सुद्धा पवारांनी शेतकऱ्यांना दिले होते.AM News Developed by Kalavati Technologies