अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीला आली पञ देण्याची वेळ, पोलिसांचा अवैध धंद्याकडे कानाडोळा

ग्रामपंचायतीने हे धंदे बंद करण्यासाठी लेखी पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे

पुणे  । सध्या पुणे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राजरोसपणे जुगार, मटका, वेश्याव्यवसाय, दारू, गांजा यांची विक्री केली जात असून आता या विरोधात चक्क ग्रामपंचायतीने हे धंदे बंद करण्यासाठी लेखी पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील लोणीकंद, पेरणे ग्रामपंचायतच्या वतीने नुकतेच लोणीकंदचे पोलीस निरीक्षक आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक यांना परिसरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी मागणी केली आहे. या धंद्यामुळे अनेक लोकांचे, गोरगरिबांचे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरी या अवैध व्यवसायावर कडक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे असल्याचे निदर्शनास येत आहे. आत्तापर्यंत सामाजिक संघटना, आरटीआय कार्यकर्ते, माहिला हेच याबाबत आवाज उठवत होते. परंतु आता चक्क ग्रामपंचायतीने पत्र दिल्याने अवैध धंद्याची व्यापकता किती मोठी आहे हे दिसून येते. यामुळे असे अवैध व्यवसाय हे कोणामुळे फोफावतात ? हे का बंद होत नाही? याच्या पाठीमागे कोण आहे? याबाबतीत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies