पन्हाळ्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग व अंगणवाडी भरवली जाते

पन्हाळा । पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सांडपाण्याचा नळ आणून सोडलेला आहे तसेच संरक्षण भिंतीच्या जवळच यात्रेच्या वेळी खाटीक समाजातील लोकांनी बकरी कापून अस्वच्छता निर्माण केली आहे. या सर्वाचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होणार असल्याने याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग व अंगणवाडी भरवली जाते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच खाजगी घरमालकाने सांडपाण्याचा नळ उघडा केला आहे. त्यामुळे सकाळी शाळेत जातानाच विद्यार्थ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे.

इथे शिक्षण घेणारी मुलं ही लहान असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो शाळेतील शिक्षकांनी याबाबत ग्रामसेवक व संबंधितांना वेळोवेळी तोंडी कल्पना दिलेली आहे परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे दररोजच्या या प्रकारामुळे लहान मुलांच्या दैनंदिन आरोग्यावर परिणाम होत आहे त्यातच नुकतीच पार पडली कोलोली गावची देव दीपावली ची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बकऱ्यांची मोठी कत्तल ही झाली परंतु ही बकरी शाळेच्या संरक्षण भिंतीच्या जवळ व प्रवेशद्वाराच्या शेजारीच कापण्यात आली त्याचे रक्त व इतर सर्व घाण प्रवेशद्वाराजवळच टाकण्यात आली याबाबतही शिक्षकांनी बकरी येथे कापू देऊ नका असे ग्रामपंचायतीला कळवलेले होते परंतु या बाबीकडे ही ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही अगोदर चेच सांडपाणी आणि त्यात बकऱ्यांच्या घाणीचा परत वास यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होणार आहे त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवेशद्वाराजवळच सांडपाण्याचा निचरा बंद करावा व व शाळेच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू देऊ नये व शालेय परिसर स्वच्छ ठेवून लहान मुलांची आरोग्य वमन प्रफुल्लीत ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी पालकांच्या मधून होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies