गुळाचा गोडवा झाला कमी, दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

गुळ 50 ते 60 रुपये किलो. बाजरी 25 ते 30 रुपये तर ब्रँडेड कंपन्याकडून तिळगुळ 200 ते 300 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे

सोलापूर ।  मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळ-गुळ व बाजरीस मोठी मागणी असल्यामुळे बाजारात तिन्ही वस्तूचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य महिलांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. गेल्यावर्षी तिळगुळ व बाजरीच्या किमती आवाक्यात होत्या. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती व अतिवृष्टीमुळे तीळ व बाजरीचे उत्पादन घटले आहे. मात्र मागणी वाढल्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे.बाजारातील 150 ते 160 रुपये किलो.

गुळ 50 ते 60 रुपये किलो. बाजरी 25 ते 30 रुपये तर ब्रँडेड कंपन्याकडून तिळगुळ 200 ते 300 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला महत्व आहे. हा सण थंडीच्या दिवसात येतो त्यामुळे याकाळात उष्ण पदार्थ खाणे आरोग्यदायी असते.म्हणून तिळगुळाला महत्व प्राप्त झाले आहे. बाजारात तिळाचे लाडू, चिक्की, हलवा विक्रीसाठी आला आहे. मकर संक्रांतीच्या सणामुळे बाजरी तिळ -गुळ या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य महिलांचे आर्थिक बजेट कोलमडणार हे मात्र नक्की.AM News Developed by Kalavati Technologies