उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग, पशुधनाचे आरोग्य धोक्यात

प्रशासनाने उपाययोजना करावी नगरिकांची मागणी

इंदापूर । घोटभर पाणी घशाची कोरडं भागवते म्हणतात, मात्र हेच पाणी आता जीवावर उठलेय. इंदापूर तालुक्याला यशवंत सागरासारखा भला मोठा प्रकल्प लाभला आहे. भीमा ही इंदापूर तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी असून लाखो एकर शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. तर भीमा या नदीच्या काठी कित्येक गांवांची लोकवस्ती वसली असुन हे उजनीचं पाणी हा त्यांचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र हेच उजनीचं पाणी आता त्यांच्या जिवावर उठले आहे.

पुणे शहरापासून येणारी प्रचंड घाण, जलपर्णी व औद्योगिकरणातून सोडण्यात येणारी रसायणे यामुळे या पाण्याचा रंग गडद हिरवा झालाय. आतातर या पाण्याचा किळस येणारा वास यामुळे नदीकाठच्या गावांना यामुळे प्रचंड त्रास होतो आहे. उजनीच्या काठी कित्येक लोकवस्त्या वसल्या असून पशुधनातून दुग्धोत्पादन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र य पाण्यामुळे आता त्यालाही ग्रहण लागले आहे. एकूणच घसा कोरडं करणारे हे पाणी आता घशाचा घोट घेणार कि काय अशा अवस्थेत आहे.AM News Developed by Kalavati Technologies