कांदा आयातीचा निर्णय इथंल्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी

सरकारने तुर्कस्तानमधून 11 हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर ।  कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कांद्याचे भाव वाढून दोन महिने झाले आहेत. मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला? सरकारचा हा निर्णय आत्मघातकी आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा असल्याचे शेट्टी यांनी म्हंटले आहे.

सरकारने तुर्कस्तानमधून 11 हजार टन कांदा आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर तर कोसळतील. परिणामी इथल्या शेतकऱ्यांना आपला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येणार आहे. शिवाय या निर्णयाने कोणाचाही फायदा होणार नाहीये. कांदा अशा वेळी आयात करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना तर दिलासा मिळणार नाहीच उलट शेतकऱ्यांचीच वाट लागणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies