मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस

जेव्हा जेव्हा मी आता या खुर्चीवर बसतो. तेव्हा तेव्हा मला मुख्यमंत्री समोर असल्याचा भास होतो, अशा भावना सबनीस यांनी व्यक्त केल्या.

सांगली | दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सांगलीतल्या इस्लामपूरच्या तहसील कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. इमारतीच्या उद्घाटनाची फीत कापल्यानंतर उद्धव ठाकरे आणि सोबतच्या मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी इमारतीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत इस्लापूरचे तहसीलदार देखील होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव यांनी दिलेल्या आदरतिथ्यामुळे आणि प्रेमळ वागणुकीमुळे तहसीलदार रविंद्र सबनीस भारावून गेले.

कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर तहसीलदारांच्या केबीमधल्या खुर्चीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळापुरतं बसले. त्यांच्यापुढे तहसीलदार उभे होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तहसीलदार आहात ना, मग बसा या खुर्चीवर, असा आदेश दिला. मात्र समोर जिल्हाधिकारी, मंत्री आणि राज्यमंत्री आहेत. त्यांच्यापुढे या खुर्चीवर मी बसू शकत नाही, असं तहसीलदार म्हणाले.

तहसीलदारांच्या या उत्तरावर मग उद्धव यांनी अतिशय प्रेमाने त्यांना समजावलं. मी तुम्हाला स्वत: खुर्चीत बसवतोय. आता धडाडीने आणि चोखपणे काम करा, असं उद्धव सबनीसांना म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एवढ्या प्रेमळ वागण्याने तहसीलदार भारावून गेले. मुख्यमंत्री उद्घाटन करून गेलेत. मात्र जेव्हा जेव्हा मी आता या खुर्चीवर बसतो. तेव्हा तेव्हा मला मुख्यमंत्री समोर असल्याचा भास होतो, अशा भावना सबनीस यांनी व्यक्त केल्या.AM News Developed by Kalavati Technologies