बांधकाम सभापती प्रवीण मानेंचा जिल्हा परिषदेत विशेष सन्मान

पुणे जिल्हा परिषद भवन इथे सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला

इंदापूर । इंदापूर तालुक्याचे उगवतं नेतृत्व पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. नुकताच शुक्रवारी त्यांचा पुणे जिल्हा परिषद भवन इथे सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. शरद लेंडे, गटनेत्या आशाताई बुचके, अतुल देशमुख, कॉंग्रेस गटनेते विठ्ठल आवाळे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी व्ही. शेंडगे आदी मंडळी उपस्थित होती.

२०१७ साली प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातून पळसदेव-बिजवडी गटातून पुणे जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवली.आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडूनही आले. त्यांच्यातील कामाचा जोश व पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीच्या सभापती विराजमान करुन कामकाजाची सूत्रे सुपूर्त करण्यात आली. गेले अडीच वर्षात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून प्रवीण माने यांनी आपल्या कार्याची जी धमक दाखवली आहे त्यातून ते संपुर्ण जिल्ह्यात युवा सभापती म्हणून चर्चेत देखील राहीले आहेत.यावर बोलताना प्रवीण माने म्हणाले कि,नागरिकांनी व पक्षाने माझ्यावर ठेवलेल्या या विश्वासाला मी सार्थ ठरविण्यासाठी सातत्याने गेली २ वर्ष मी काम करतो आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहानगीपासून ते माता- भगिनी- आज्जीपर्यंत तसेच बाल - तरुणांपासून, ज्येष्ठ- वडिलधाऱ्यांपर्यत सगळ्याच समाज घटकांची कामे पूर्णत्वास पोहचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात बांधकाम विभागांतर्गत गुणवत्तापूर्ण कामे वेळेत करण्यासाठी शिवाय आरोग्य खात्यामार्फत जिल्ह्यातील सर्वसाधारण नागरिकांना शाश्वत आरोग्य सेवा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत योग्य ते प्रयत्न केले आहेत.

या सर्व गोष्टींमुळे पुणे जिल्हा परिषद आरोग्य सेवेच्याबाबत संपुर्ण राज्यात अव्वल स्थानी ठरली.  व्यक्ती तितक्या कथा-अनं जितक्या कथा तितक्याच व्यथाही असतात. जिल्हा परिषद भवनात आतमध्ये शिरत असताना आम्हा सर्वांकडूनच कामाच्या अपेक्षेने आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील त्यांच्या सेवेसाठीचा आग्रही भाव, जिल्हा परिषदेतील प्रत्येक सदस्स्य, अधिकारी व कर्मचारी वर्गास कामासाठी उर्जा देत असतो. प्रत्येक जण आपापल्या मागच्या इतर गोष्टी सोडून सेवेठायी तत्पर असतो. नागरिकांसाठी केलेले कार्य पूर्णत्वास गेल्यावर मिळणारा आनंद हीच बाब सर्वात जास्त समाधानाची आहे.AM News Developed by Kalavati Technologies