धक्कादायक | कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून कैद्यांचे पलायन, एक ताब्यात, दुसरा फरार

अलिबाग कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेल्या दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारुन पळ काढला आहे.

रायगड | रायगडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलिबाग कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेल्या दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारुन पळ काढला आहे. पोलिसांनी त्यांचा तात्काळ पाठलाग करून एका जणाला ताब्यात घेतलं आहे. मात्र दुसरा कैदी हा पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. सदरील कैद्याला शोधण्यासाठी पोलिसांनी अलिबागमध्ये नाकाबंदी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्यापही या कैद्याचा ठावठिकाणा लागला नाहीये. अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही पाचवी ते सहावी घटना आहे. अलिबाग तालुक्यात आणि कोलाडमध्ये घडलेल्या बलात्काराच्या आरोपाखालील दोन कैद्यांना कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या दोन कैद्यांनी कारागृह पोलिसांची नजर चुकवून दगडी भिंतीवरून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून एका कैद्याला पकडले आहे. मात्र दुसरा कैदी हा सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे. AM News Developed by Kalavati Technologies