धक्कादायक! खोपोलीमध्ये 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

खोपोली शहरातील एका लॉजमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिहारी कुटुंबापैकी एका 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

खोपोली | खोपोली शहरातील एका लॉजमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिहारी कुटुंबापैकी एका 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पाताळगंगा नदीमध्ये त्या मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला. बिहारमधून आलेले कुटुंब गेल्या तीन दिवसांपासून एका लॉजवर वास्तव्य करत होते. अचानक हे सर्वजण शुक्रवारी पहाटे लॉज सोडून निघाले असता यातील बापाने दोन्ही मुली व आईला निर्जनस्थळी नेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्याच्या तावडीतून एक मूलगी व आईने पळ काढला मात्र दुसरी मुलगी त्याच्याकडे होती पळालेल्या आईला व मुलीला काही तरी वाईट होईल अशी शंका आल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.AM News Developed by Kalavati Technologies