पुण्यात नववर्षाला कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता - केंद्रीय पथक

केंद्रीय पथक पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, डिसेंबर जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचं केंद्रीय पथकानं सांगितलं आहे

पुणे । पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पुण्यात आले असून, जम्बोसह कोरोनाबाधित क्षेत्राची आज त्यांनी पाहणी केली, कोरोनाची सद्यस्थिती त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचना ही केल्या आहेत. पुढील दीड महिने म्हणजे, नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल. असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र, संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत होता. रोजच जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ होत होती. त्यानंतर आता प्रशासनाने लादलेल्या नियमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाण कमी झाला आहे. केंद्रीय पथकाने आज जिल्ह्यातील कोरोना स्थितीची पाहणी केली असता, डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं केंद्रीय पथकानं सांगितलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies