मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात, संभाजी ब्रिगेडचा विरोध

या झेंड्याच्या विराेधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव येथे होत आहे. राज्यभरातून हजारो मनसैनिक या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान सकाळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. हा झेंडा संपूर्ण भगवा आहे. झेंड्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मात्र आता हा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नव्या झेंड्याविरोधात संभाजी बिग्रेडने पुण्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

या झेंड्याच्या विराेधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे पक्ष आणि राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे करण्यात आला आहे. हे. राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा आहे. राजमुद्रेच्या झेंड्यामध्ये वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नसल्याचे या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभागी ब्रिगेडकडून करण्यात आली. तसेच वेळ पडल्यास संभाजी बिग्रेड न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नव्या झेंड्यावरील राजमुद्रा मागे घेतली नाही तर संभाजी बिग्रेड रस्त्यावर उतरणार असा इशाराही देण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies