कोरोनाच्या नावाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट

खासगी दुध डेअरीवर कारवाई करण्याची मागणी

सोलापूर | कोरोनाशी लढा देण्यासाठी सारा देश सज्ज झालाय. सरकारने विविध उपाययोजना जाहीर करुन शेतकरी, मजूर, कष्टकरी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, काही समाजकंटक कोरोनाचे संकट संधी म्हणून घेताना दिसत आहेत. खासगी दूध डेअरी चालक दुधाचे दर पाडून शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत.

ग्रामीण भागात दुध उत्पादक शेतकर्यांची लुट चालू असल्याच्या तक्रारी येत आहेत. राज्यात लॉकडाऊन करण्यापूर्वी खासगी डेअरी चालक 32 ते 34 रुपये दराने दुध खरेदी करीत होते. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हेच दर 18 ते 20 रुपये झाले आहेत. लिटर मागे 12 ते 14 रुपये दर कमी केल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे जगवणे देखील मुश्किल झाले आहे. एकंदरीतच ही लूट तात्काळ न थांबवल्यास जनावरे सोडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे दुध उत्पादक शेतकरी सांगत आहेत. तसेच या खासगी दुध डेअरीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies