पुणे-सोलापूर मार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात, दोन ठार एक जखमी

इको गाडीतील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुणे | पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहनांच्या विचित्र अपघात झाला. यामध्ये इको कारमधील दोन जण जागीच ठार झाले आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यवत पोलीस ठाण्याअंतर्गत सहजपूर येथे ही दुर्घटना घडली.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या टँकरने धडक दिली. टँकरला टेम्पो, टेम्पोला इको मारुती कार आणि कारला ट्रकने धडक दिली. इको गाडीला मागील ट्रकने जोरदार धडक दिल्याने टेम्पो व ट्रकच्यामध्ये इको गाडीचा चुराडा झाला. यामध्ये इको गाडीतील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies