साध्वी ठाकूर यांना पाठविलेल्या ‘त्या’ पत्राचे पुणे कनेक्शन

पत्रामध्ये पंतप्रधान मोदी, डोभाल आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो

पुणे । भारतीय जनता पार्टीच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे एक संशयास्पद पत्र पाठवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ते पुण्यातून पाठवण्यात आले असून, त्यावरील पत्ता शिवाजी चौक खडकी बाजार खडकी, ता. जिल्हा पुणे, महाराष्ट्र ,इंडिया असा आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद या व्यक्तीचा पाठवणारा म्हणून उल्लेख त्या पत्रावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

हे पत्र उर्दु भाषेत लिहलेले आहे. त्या सोबत दोन पुड्या पांढर्‍या रंगाची पावडर देखील पाठवण्यात आली आहे. या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच भोपाळ येथील स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्र व त्या सोबत आलेली पावडर ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली आहे.
या पत्रामध्ये पंतप्रधान मोदी, सुरक्षा सल्लागार डोभाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोचां देखील समावेश असून, त्यावर लाल पेनाने संशयास्पद खूना करण्यात आल्या आहेत. समोर फोटोमध्ये या सर्वांवर बंदूक रोखल्याचे दिसून येते. याबाबत पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies