गणेशोत्सव काळात पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीला अटक

तीन सराईत गुन्हेगाराकडून 6 पिस्तुल 11 राऊंड जप्त जप्त करण्यात आले आहेत.

कोल्हापूर | गणेशोत्सव काळात पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीला अटक कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांची ही मोठी कारवाई आहे. तीन सराईत गुन्हेगाराकडून 6 पिस्तुल 11 राऊंड जप्त जप्त करण्यात आले आहेत. शुभम शिंदे, आदिनाथ बडेकर आणि शर्मेश राठोड या तिघांना अटक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे बंगलोर महामार्गावरील कणेरी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

 गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांची कुंडली काढायला सुरवात केली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी या अनुषंगाने माहिती मिळवली. यानंतर गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी येथील शुभम शिंदे हा बेकायदा पिस्तूल वापरत असल्याची तसेच तो पिस्तूल खरेदीविक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मंगळवारी शिंदे आपल्याकडील पिस्तूल विकण्यासाठी कणेरीवाडी फाटा परिसरात येणार असल्याच समजताच पोलिसांनी तिथे छपा टाकून शिंदे सह पिस्तूल खरेदीला आलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिनाथ बडेकरला अटक केली. दोंघाकडुन गावठी बनावटीच्या पिस्तुल व 7 राऊंड जप्त करण्यात आले.या दोघांकडील तपसात आणखीन धक्कादायक माहिती समोर आली.बडेकरने या आधी शिंदे कडून 2 पिस्तुल व 4 राऊंड खरेदी केल्या होत्या. त्या नवी मुंबई,कमोठे परिसरातील शर्मेश राठोड याला विकल्याच समोर आलं. पोलिसांनी या गुन्ह्यात राठोड ला ही अटक केली असून त्याच्याकडील हत्यार आणि राऊंड देखील जप्त करण्यात आलेत.AM News Developed by Kalavati Technologies