पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेल्या 3 कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह

मागील 5 दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये एकही नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली नाही.

पिंपरी चिंचवड | पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये आढळेल्या 3 कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे. दुबईहुन आलेल्या 3 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णलायत उपचार सुरू होते. काल त्यांच्या उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी करण्यासाठी त्यांच्या घशातील द्रव्य पाठवण्यात आले. तेव्हा काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तिघाचीही चाचणी निगेटिव्ह आली आहेत.

आज पुन्हा एकदा चाचणी केली जाईल आणि पुढील अहवालही निगेटिव्ह आल्यास त्यांना लवकरच घरी सोडलं जाईल अस पाटील म्हणाले. आणखी दिलासादायक बाब म्हणजे मागील 5 दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये एकही नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली नाही. तर ज्या 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र पिंपरी शहरात सुमारे 1200 पेक्षा अधिक रुग्णांना कॉरटाईन करण्यात आलं आहे. नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न पडण्याच आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies