विजयादशमीनिमित्त श्री जितोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात

शिलांगण लुटल्यानंतर जिंती गावातील सर्व लोक श्री जितोबाच्या मंदिरात जाऊन देवाला सोने ठेवून दर्शन घेतात

सातारा । विजयादशमी या सणाला श्री जितोबा मंदिरात पालखी सोहळा परंपरे नुसार पार पडला. श्री जितोबा मंदिरासमोर श्री जितोबा देवाची पालखी व श्री खंडोबा देवाची पालखी निघते. या पालखी समोर भोपी समाजाचे लोक आई तुळजाभवानी देवीचे परंपरेनुसार आलेले देवीचे पद म्हटले जाते व श्री जितोबा देवाचा डवर वाजवला जातो.

त्यानंतर श्री जितोबा व खंडोबा देवाची पालखी जिंती गावातील सर्व देवांना प्रदक्षणा घालून मुख्य स्टॅंडवर विसावा घेण्यासाठी थांबते. त्यासाठी जिंती गावातील सर्व ग्रामस्थ हा पालखी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना आज सोन्याचा मान असतो. हे सोने लुटण्यासाठी जिंती गावातील ग्रामस्थ या मुख्य ठिकाणी जमतात. त्या सोन्याची पाटलाच्या हातून पूजा केली जाते. नंतर जिंती गावातील लोक हे सोने लुटतात. या भक्तिमय वातावरणात सोने लुटल्या नंतर श्री जितोबा देवाच्या व श्री खंडोबा देवाच्या पालखीचे दर्शन घेतात. नंतर भोपी समाजातील लोक देवीचे पद म्हणून पालखीचे प्रस्थान होते. या सर्व उत्साहाला शिलांगण लुटले असे म्हटले जाते.

पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर श्री जितोबा मंदिराकडे मार्गस्थ होते. शिलांगण लुटल्यानंतर जिंती गावातील सर्व लोक श्री जितोबाच्या मंदिरात जाऊन देवाला सोने ठेवून दर्शन घेतात. त्यासाठी भली मोठी रांग लागते. अशा तऱ्हेने जिंती गावातील विजयादशमीचा सण हा जिंती गावात वर्षा वर्षानुवर्षे पूर्वीपासून चालत आलेला आहे. हा सण जिंती गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात साजरा करतात.AM News Developed by Kalavati Technologies